नांदेड: नैतिक शिक्षा मधून चारित्र्य निर्माण – भगवान भाई

0
98

नांदेड,महाराष्ट्र: शिक्षणाचा मूळ उद्देश मधूनच चारित्र्य निर्माण होत असतो. असत्यपासून सत्यकडे जाणे, बंधनातून मुक्तीकडे जाणे यातूनच चारित्र्य निर्माण होत असते. परंतु आजचे शिक्षण भौतिकताकडे घेऊन जात आहे. भौतिक शिक्षणापासून भौतिकता प्राप्त होते आणि नैतिक शिक्षणातून चारित्र्य निर्माण होते.

यामुळे वर्तमान काळात वेळेप्रमाणे भौतिक शिक्षणासोबत नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे असे उद्गार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट आबू राजस्थान येथून आलेले ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी काढले. ते गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक याना नैतिक शिक्षणामधून चारित्र्य निर्माण या विषयावर बोलत होते.

भगवान भाई यांनी सांगितले कि वर्तमान काळात विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य, आचरण, लेखन, व्यवहारिक ज्ञान यावर विशेष लक्ष्य दिले पाहिजे. वर्तमान काळात समाजात आलेल्या समस्या मध्ये  नैतिक मूल्य ची कमी हे मूळ कारण आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि आपल्या व्यवहारिक जीवनात परोपकार,सेवाभाव,त्याग,उदारता,पवित्रता,सहनशीलता,नम्रता,धैर्यता,सत्यता,

ईमानदारी हे सद्गुण जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपले शिक्षण अपूर्ण आहे. शिक्षण हे बीज आहे जीवन हे वृक्ष आहे जोपर्यंत आपल्या जीवनात वृक्षiत गुण रूपी फळे येत नाहीत तोपर्यंत आपण घेत असलेले शिक्षण अपूर्ण आहे.

भौतिक शिक्षणापासून  भौतिकताचा विकास होतो आणि नैतिक शिक्षणापासून सर्वांगीण विकास होतो.

नैतिक शिक्षणापासून कठीण परिस्थितीला सामना करण्याची शक्ती व आत्मविवेक, आत्मबल प्राप्त होते. नैतिकताचा विशेष गुण म्हणजेच खरे बोलणे, चोरी न करणे, अंहिसा, इतराबद्दल उदारता, विनम्रता, इत्यादी..नैतिक शिक्षणाच्या अभावामुळेच आज जगात अपराध, नशा, व्यसन, राग, भांडणे, मनभेद वाढत आहेत. नैतिक शिक्षण हेच मानवाला खरा मानव बनविते असे यावेळी भगवान भाई यांनी सांगितले.

यावेळी संचालिका आशा पैठणे यांनी सांगितले कि, नैतिक शिक्षणाने विद्यार्थीमध्ये सहनशीलता येऊन विद्यार्थी सशक्त बनतात. तसेच नैतिकता विना जीवन अंधकारमय आहे असे उद्गार काढले.

प्राचार्य सोमनाथ यांनी नैतिक गुणांच्या आधारे मनुष्य वंदनीय बनतो व नैतिकता च्या बळावर धन, दौलत, सुख, वैभव यांचा पाया आधारलेला आहे असे सांगितले.

हिंगोली राजयोग सेवाकेन्द्र च्या संचालिका ब्रह्माकुमारी आर्चना बहनजी यांनी सांगितले कि, जोपर्यंत जीवनात आध्यात्मिकता येत नाही तोपर्यंत जीवनात नैतिकता येत नाही. स्वतःला ओळखून आपला पिता परमपिता परमात्मा ची आठवण करणे हीच आध्यात्मिकता आहे यालाच राजयोग असेही म्हणतात असे समजावून सांगितले. राजयोगाला आपला दैनंदिन अंग बनवा असे आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान भाई यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला आणि शेवटी एकाग्रता वाढविण्यासाठी राजयोग मेडिटेशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन दिनेश परसवले सर यांनी केले. आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी आर्चना देशमुख यांनी मानले व भविष्यात अशा कार्यक्रमासाठी पुन्हा यावे असे आमंत्रण हि दिले. यावेळी विद्यार्थांनी या कार्यक्रमाचा लाभ झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला बीके माधव भाई व असंख्य बीके बंधू भगिनीची उपस्तीथी होती.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें