नांदेड,महाराष्ट्र। आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कैलासनगरसेवाकेंद्रात प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम दिपप्रज्वलन सेवाकेंद्राच्या संचालिका बीके शिवकन्या बहेनजी, बीके अर्चना बहेनजी, बीके जयमाला बहेनजी, बीके बालाजी भाई, रंगनानी भाई, राजकुमार बिर्ला भाई, बेदी भाई, दशरथ भाई, गणपत भाई, नागनाथ भाई यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी बीके शिवकन्या बहेनजी यांनी योग आणि योगा यामधील फरक समजावून सांगुन ईश्वरीय ज्ञानाला अंगिकारून योगा केल्यास खुपच मोठ्या प्रमाणात शरीराला व मनाला याचा लाभमिळतो याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर योगा शिक्षक बीके रंगनानी भाई यांनी प्रत्येक योगाचे महत्व समजावून सांगुन व सर्वांकडून योग करुन घेतला. याप्रसंगी बीके परिवार खुपच मोठ्या संख्येने उपस्थित होता. योगमय वातावरणात बीके परिवार प्रचंड आनंदी व उत्साही दिसून येत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीके बालाजी भाई यांनी केले.कार्यक्रमाची सांगता योग गीताने करण्यात आली.
मुख पृष्ठ अंतर्राष्ट्रीय योग दिवस नांदेड: आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कैलासनगरसेवाकेंद्रात प्रचंड उत्साहात साजरा...