नांदेड: महाशिवरात्रीनिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
132

ईश्वरीय ज्ञानात मानवापासून देवता बनण्याची क्षमता – बीके शिवकन्या दीदी
नांदेड,महाराष्ट्र: प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्र्वरीय विश्र्वविघालय शाखा सिडकोच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने बारा – ज्योतीलींग दर्शन व शिवदर्शन चित्र प्रदर्शनाचे आयोजन दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२३ या ३ दिवसासाठी ठेवण्यात आला होता. सर्व जनतेला व भाविकांना परमात्मा शिव यांचा संदेश मिळावा व ईश्वराचे यथार्थ चिंतन, स्मरण कसे करावे तसेच मन:शांती व सुखाच्या प्राप्तीसाठी ईश्वराद्वारे सांगण्यात आलेल्या सह्ज राजयोगाचे व आध्यत्मिक ज्ञानाचे महत्व मानवी जीवनात अंगीकार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या धाकधुकीच्या व्यस्त व तनावग्रस्त, चिंताग्रस्त मानवी जीवनात राजयोगाचा अंगीकार करून मानवी जीवन आनंदी, तणावमुक्त व चिंतामुक्त करून खुशहाल जीवन अनुभव करू शकतो. लाखो जण याचा अनुभव घेत आहेत हा अनुभव आपणही घेवू शकता असे मार्गदर्शनपर बीके शिवकन्या दीदी यांनी सांगितले. सिडको व नांदेड शहर मधील सर्व जनतेसाठी १२ ज्योतीलिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्याचा अमृतयोग या निमित्ताने आला आहे याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आव्हान बीके शिवकन्या दीदी यांनी केले होते.
या प्रदर्शनासाठी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर साप्ताहीत कोर्स, राजयोग मेडिटेशन शिबीर, प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्र्वरीय विश्र्वविघालय शाखा सिडको मार्फत राजयोग शिबिराचे आयोजन दि. २० फेब्रुवारी २०२३ पासून (ज्ञानेश्वरनगर बालाजी मंदिर कमान) येथे सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ७:३० ते ८:३० या वेळात ठेवण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सोबत दिलेल्या नंबरवर ९८८१०६२९६० संपर्क साधावा असे ब्रह्माकुमारीज च्या वतीने कळविण्यात येत आहे.
महाशिवरात्रीनिमित्य शिव ध्वजारोहण करण्यात आले –
शिव ध्वजारोहण मा.राजेश्वर चेरेकर महाराज – गणपती मंदिर, सिडको, मा.शंकर स्वामीजी – आयुर्वेदाचार्य, मा.गुंडेराव चेरेकर महाराज – गणपती मंदिर, मा.योगेश्वर महाराज – गणपती मंदिर, मा.दिव्यांशु महाराज – बालाजी मंदिर सिडको, मा.मधुकर पुजारी महाराज – दक्षिणमुखी हनुमान मंदिर, मा.ललित साहेब – युनियन बँक मॅनेजर, मा.दमकोंडवार साहेब – अध्यक्ष बालाजी मंदिर हडको, मा.मोरे साहेब – विश्वस्त बालाजी मंदिर हडको या मान्यवरांच्या हस्ते शिव ध्वजारोहण करण्यात आले. सदरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन नांदेड सेवाकेंद्राच्या मुख्य संचालिका बीके शिवकन्या दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सिडको गीता पाठशालेचे संचालक बीके दिनकर भाई व यांची संपूर्ण टीम बीके ज्ञानेश्वर भाई, उदगीरे भाई, अजय भाई, बालाजी मोरे भाई, त्र्यंबक भाई व सर्व बीके भाई, बहेन, कुमारी, माता भगीनी नी अथक परिश्रम घेतले. या कार्यकर्माला सिडको व नांदेड शहरातील बीके परिवार व नागरिकांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके नक्कावार माता यांनी केले व आभार प्रदर्शन बीके बालाजी भाई यांनी
केले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें