पिंपळगाव बसवंत: शिवस्मृती केंद्रातून सर्वसामान्य समाजाची सेवा होणार – राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदी

0
360

शिवस्मृती या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दिदी यांचा सत्कार करताना निफाड तालुक्याचे आमदार काका बनकर व सौ मंदाकिनीताई बनकर व समवेत नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी

पिंपळगाव बसवंत ,महाराष्ट्र: परमात्मा शिवबाबाने सर्वांना स्मृतीस्वरूप बनण्यासाठीच संदेश दिला आहे. स्मृतीतूनच समृद्धी येते. स्मृती हीच  खरी समृद्धी असते. ही ईश्वराची शिकवण आहे. प्रत्येकाने ईश्वरीय शिकवणीचा जीवनामध्ये उपयोग करायला शिकले पाहिजे. पिंपळगाव बसवंत येथे ‘शिवस्मृती’ हे अध्यात्म केंद्राची भव्य वास्तू उभी राहिली आहे. या केंद्रातून सर्वसामान्य समाजाची सेवा होणार आहे असे उद्गार माउंट आबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी संतोष दीदी यांनी काढले.          

पिंपळगाव बसवंत येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिवस्मृती या अध्यात्मिक केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा राजयोगिनी संतोष दीदी संपन्न झाला.त्यानंतर प्रमिला लॉन्स येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.  त्या पुढे म्हणाल्या की, प्रयोगातून माणूस नेहमी परिपक्व बनत असतो. सत्याचा नाश कधी होत नाही आणि म्हणून सत्याच्या शक्तीचा स्वीकार करा. निर्भय होऊन सत्याच्या मार्गावर चालत रहा. सत्य कधीही हरवले किंवा मिटवले जाऊ शकत नाहीत. कोणतेही काम विचारपूर्वक केल्याने ते मूर्त स्वरूपात येते. त्यासाठी नम्रता ही फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने ती अंगी बाण ण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.अहंकार हे ऱ्हासाचे मूळ कारण असते. हे विश्व एक परिवार आहे. चांगल्या गोष्टी ग्रहण करा. त्यांचा स्वीकार करा. इतरांच्या कल्याणासाठी ईश्वरी शक्तीचा वापर करा. कारण ती शक्ती सत्य शिव आणि सुंदर स्वरूप आहे. असेही संतोष दिदी यांनी यावेळी सांगितले सकाळी दहा वाजता शिवस्मृति या अध्यात्मिक केंद्राच्या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा राजयोगिनी ब्रह्मकुमारी संतोष दीदी यांच्या शुभहस्ते तसेच राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी व निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर,सरपंच भास्कर बनकर  व माजी जि. प. सदस्या सौ. मंदाकिनी बनकर,सौ वैशालीताई बनकर,पिंपळगाव बसवंत सेवा केंद्राच्या संचालिका आरती दिदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोनशीला अनावरण करून संपन्न झाला. यावेळी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांनी राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दिदी आणि वासंती दिदी यांचा सत्कार करत ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रमिला लॉन्स येथे कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी शक्ती दीदी, ब्रह्माकुमारी विना दीदी,ब्रह्मकुमारी पूनम दीदी ब्रह्मकुमारी मनीषा दीदी,ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी,ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, ब्रह्मकुमारी मंगल दीदी, ब्रह्मकुमारी शितल दीदी,ब्रह्माकुमारी कावेरी दीदी,ब्रह्मकुमारी उज्वला दीदी आदीसह जिल्हाभरातील विविध सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी व ब्रह्माकुमारी उपस्थित होते.  पिंपळगाव केंद्राच्या संचालिका आरती दीदी यांनी सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पिंपळगाव ग्रामपालिकेच्यावतीने सरपंच भास्करराव बनकर यांनी अतिथींचा सत्कार केला. यावेळी वास्तूविशारद नाठे, पाटोळे यांचा सत्कार संतोष दिदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. गणेश वंदना होऊन आरती दीदी यांनी सर्वांचे स्वागत केले. स्वागत करताना त्यांनी केंद्र उभारणीचा केलेला संकल्प शिवबाबांच्या आशीर्वादाने पूर्णत्वास गेल्याचे सांगितले. यामागे शिवबाबांचीच शक्ती आहे. म्हणून अशक्य ते शक्य झाले. आता या केंद्राचा स्वर्ग बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर भास्करराव बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी  वासंती दीदी आत्मिक विकास करण्यासाठी ध्यान धारणेचे महत्त्व विशद करत  मार्गदर्शन केले. ९५ वर्ष वयाचे  जाधव गुरुजी यांनीही अनुभव कथन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपरगावच्या ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी केले. तर नरेंद्रभाई यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर ब्रह्मप्रसाद देण्यात आला.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें