नांदेड: ख़ुशीमय जीवनासाठी सकारात्मक विचाराची आवश्यकता – भगवान भाई

0
142

नांदेड,महाराष्ट्र: जीवनात रोगमुक्त, दिर्घiयु, शांत, यशस्वी बनण्यासाठी आपल्यात सकारात्मक विचाराची आवश्यकता असणे आवश्यक आहे. वर्तमान काळात तणावापासून मुक्त बनण्यासाठी सुद्धा सकारात्मक विचाराची खूप आवश्यकता आहे. जर आपले विचार सकारात्मक असतील तर त्याचा प्रभाव पण सकारात्मकच पडेल. असे उद्गार ब्रह्माकुमारी संस्था मुख्यालय माउंट आबू राजस्थान येथून आलेले ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी सिडको येथील ब्रह्माकुमारीज राजयोग केंद्र येथे ख़ुशीमय जीवनासाठी सकारात्मक विचाराची आवश्यकता या विषयावर बोलताना काढले.
भगवान भाई यांनी सांगितले कि सकारत्मक विचारातून समस्यातुन समाधान निघतो. वाईट मधून पण चांगले पाहता येते व मनावर काबू करता येते. मनामध्ये चालणाऱ्या विचारातून स्मृती, वृत्ती, भावना, दृष्टीकोन आणि व्यवहार बनत असते. जर मनात नकारात्मक विचार असतील तर स्मृती, वृत्ती, दृष्टी, भावना, दृष्टीकोन आणि व्यवहार सुद्धा नकारात्मक बनतो. असे झाल्याने मनात तणाव निर्माण होतो. मनातील विचार हेच वास्तव मध्ये बीज आहे.
भगवान भाई यांनी सकारत्मक विचारास संजीवनी बुट्टी असे नाव दिले आहे. साकात्मक विचार करणारा कठीण परिस्थितीला स्वीकार करून यशस्वी होऊ शकतो. तणावातून नशा, वाईट व्यसन,सवय लागते. यातूनच आपल्या हातून वाईट घडत जाते.
भगवान भाईने सांगितले कि सकारात्मक विचारच आपणास यश मिळवून देतात यासाठी आपण सदैव सकारात्मक विचारास अंगिकारले पाहिजे.
याप्रसंगी बोलतां किशनलाल यांनी सांगितले कि सकारात्मक चिंतनातून सहनशीलता येते आणि समस्यांचे निराकरण हि होते. मनाच्या विचाराचा प्रभाव झाड, फुले, निसर्गावर व एकमेकांवर पडत असतो.
हिंगोली राजयोग सेवा केन्द्र च्या संचालिका ब्रह्माकुमारी आर्चना बहनजी यांनी सांगितले कि राजयोगाच्या नित्य अभ्यासाने आपले मनोबल व इच्छाशक्ती वाढते. तसेच आपण कोण, आपला कोण व राजयोगाचे महत्व पटवून दिले तसेच भगवान भाई यांचे मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिडको सेवाकेंद्राचे संचालक दिनकर भाई यांच्या हस्ते भगवान भाई यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी भगवान भाई यांनी मनोबल व आत्मबल वाढविण्यासाठी राजयोग मेडिटेशन पण कसे करावे हे सांगून सर्वाकडून करून पण घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवाकेंद्राच्या बीके बंधू भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें