नाशिक: श्री शिवमहापुराण कथा परिसरामध्ये ब्रह्माकुमारीच्यावतीने आयोजित  अध्यात्मिक प्रदर्शनीचे उद्घाटन

0
302

अध्यात्मिक प्रदर्शन व द्वादश ज्योति्लिंग देखावा लाखो भक्तांसाठी भक्तीपीठ ठरेल – ना. दादा भुसे

नाशिक,महाराष्ट्र: देशभरातील  बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने शिवभक्त विविध राज्यांमध्ये जात असतात. मात्र ब्रह्माकुमारी संस्थेच्यावतीने  ईश्वरीय संदेश देण्यासाठी  बारा ज्योतिर्लिंग प्रतिकृती व चित्र प्रदर्शनचे आयोजन येथे सुंदररित्या केले आहे. या प्रदर्शनातून  सर्व मानवी आत्म्यांना सुख शांती, आनंद चा मार्ग नक्कीच प्राप्त होईल. हे अध्यात्मिक प्रदर्शन  लाखो भक्तांसाठी भक्तीपीठ ठरेल.  मोठ्या संख्येने सर्व भाविकांनी ह्या अध्यात्मिक  प्रदर्शन व द्वादश ज्योतिर्लिंग देखव्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे प्रतिपादन  कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तथा पालकमंत्री  ना. दादा भुसे यांनी केले.

ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातर्फे कथा परिसरात द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन आध्यात्मिक मेळा व चित्र प्रदर्शनी उद्घाटन पण ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी  ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी होत्या.  

या मेळ्याचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री व शिवपुरान कथा  स्वागताध्यक्ष ना.दादा भुसे यांच्या शुभहस्ते फीत कापून दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयोजन समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते,ब्रह्माकुमारी विना दीदी, ब्रह्माकुमारी शक्ती दीदी,ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी,ब्रह्माकुमारी ज्योती दीदी,ब्रह्माकुमारी विनू दीदी,ब्रह्माकुमारी मंगल दिदी, ब्रह्मकुमारी कावेरी दीदी,कथा आयोजन समिती सदस्य प्रवीण तिदमे, सुदाम कोंबडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय सांगळे,सदस्य प्रवीण तिदमें आदी मान्यवर कार्यक्रमांत उपस्थित होते.

यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष तथा आयोजन समिती अध्यक्ष अजय बोरस्ते बोलताना म्हणाले की, आज सर्वांगीण विकास व  मन:शांतीसाठी अध्यात्म व ध्यान धारणेची नितांत गरज आहे. अध्यात्म  व ध्यानधारणा हे माणसाच्या आंतरिक जीवनाशी निगडीत आहे आणि त्याची सुरुवात आंतरिक प्रवासापासून होते. त्या सर्व क्रिया  माणसाला पवित्र, निर्मळ बनवत त्या माणसाला आनंददायी करतात. पूर्णतेची अनुभूती देत असतात.  हे सर्व पवित्र कार्य ब्रह्माकुमारी वासंती दीदी व त्यांचा व संपूर्ण परिवार अथकपणे करत आहेत. ब्रह्माकुमारीच्या मेडिटेशनद्वारे तणाव मुक्ती होऊन सकारात्मक विचार निर्माण होतात,  याची सर्वत्र  अनुभूती येतांना दिसते, असे उद्गार बोरस्ते यांनी काढले.यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी म्हणाल्या की,जगभरात प्रसिद्ध भारतभर विविध ठिकाणचे  १२ ज्योति्लिंगाचे दर्शन एकाच छताखाली भाविकांना उपलब्ध होत असून येथील अध्यात्मिक चित्र प्रदर्शन च्या माध्यमातून भाविकांना भगवंताचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. या आयोजनातून समाजात नक्कीच आध्यात्मिक जनजागृती होईल व समाजात सुख शांती प्रस्थापित होईल असे मत व्यक्त केले. या अध्यात्मिक मेळ्याचा सर्वभाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असेही आवाहन ब्रह्मकुमारी वासंती दीदीजींनी याप्रसंगी केले.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ब्रह्माकुमारी विनादिदी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी आणि आभार मंगलदीदी यांनी मानले. यावेळी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीके संदेश भाई, रजनीकांत भाई, मनोहर भाई, कस्तूभभाई, विपुलभाई,मोहन राऊत सर,बाळासाहेब सोनवणे सर,मोहन भाई,साहेबराव भाई,गिरीश भाई,निखील भाई आदींसह माता-भगिनींनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारी परिवारातील साधक सेवेकरी तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें