ईश्वरीय ज्ञानामध्ये मनुष्यापासुन देवता बनण्याची क्षमता – बीके शिवकन्या दीदी
नांदेड,महाराष्ट्र: प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने मंगळवार रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे सुरूवात जुना मोंढा येथुन वजिराबाद, एसपी ऑफीस, कलामंदिर मार्गाने येऊन शासकीय आयटीआय शिवाजीनगर च्या समोर विष्णू काॅमपलेकस च्या बाजुला प्रजापिता ब्रहमाबाबा सभास्थळी दाखल झाली.
यानंतर कार्यक्रमाचे उदघाटन प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या संचालिका राजयोगीनी शिवकन्या दीदी, सिडको सेवाकेंद्राचे दिनकर भाईजी व प्रसिद्ध उद्योगपती बीके अजय भंडारी तसेच प्रसिद्ध उद्योगपती काला सेठ, प्रसिद्ध उद्योजिका राजश्री हेमंत पाटील व व्यवसायिक राधेश्याम मनियार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीके दिनकर भाईजी यांनी केले.
आजच्या धावपळीच्या व्यस्त व तणावग्रस्त, चिंताग्रस्त मानवी जिवनात राजयोगा मेडीटेशनचा अंगीकार करून जिवन आनंदी, तणावमुक्त व चिंतामुक्त बनवून खुशहाल सुखी जिवनाचा अनुभव करु शकतो तसेच ईश्वरीय सत्य ज्ञानामध्ये मनुष्यापासुन देवता बनण्याची क्षमता आहे. आज लाखों जण याचा अनुभव घेत आहेत हाच अनुभव आपणसुद्धा घेउ शकता असे मार्गदर्शन प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या संचालिका राजयोगीनी शिवकन्या दीदी यांनी केले.
तसेच बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन व ईश्वरीय ज्ञानाची माहिती तसेच राजयोगा मेडिटेशन हे सर्व एकाच छताखाली एकाच ठिकाणी होत असल्याने या सुवर्ण संधीचा नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या संचालिका राजयोगीनी शिवकन्या दीदी यांनी केले.