नांदेड,महाराष्ट्र: प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या वतीने महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा कारागृहात महिला बंदीना साडीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे हे होते. यावेळी कैलासनगर सेवाकेंद्राच्या वतीने बीके पदमा बहेन यांनी महाशिवरात्रीचे महत्व व ईश्वरीय विश्वविद्यालयाची माहिती व ईश्वरीय ज्ञानाची माहिती सांगितली.आणि राजयोगा मेडिटेशन करून महिला बंदीना पुष्पगुच्छ देऊन साडीचे वाटप करण्यात आले.यानंतर बीके शिवप्रिया बहेन यांनी महिला दिनाचे महत्व व सकारात्मक विचारांचा अंगिकार केल्यास आपण कारागृहात देखील सुखी राहु शकतो आणि ईश्वरीय ज्ञानाने अनेकांच्या जीवनात बदल घडून आला आहे तुमच्यात सुध्दा बदल घडु शकतो फक्त निश्चय करा असे बहुमोल मार्गदर्शन केले.यानंतर बीके नागनाथ महादापुरे यांनी कारागृहात मिळत असलेल्या वेळेचा सदुपयोग करा व ज्यामुळे किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला कारागृहात यावे लागले त्यांच्याबद्दल द्वेष न बाळगता शुभभावना द्या आणि आपण ज्या स्थितीत आहोत त्याला केवळ आणि केवळ आपणच जबाबदार आहोत ईतर कोणीही नाही. जे चुकीचे झाले त्याची उजळणी करण्यापेक्षा यापुढे चुकीचे काही घडणार नाही असा निर्धार करा आणि आनंदी जिवन जगा असे मोलाचे मार्गदर्शन केले.
कारागृहात महिला दिनानिमित्त महिला बंदीना साडीचे वाटप करण्याची संधी दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे व संपूर्ण टिमचे आभार मानले.यावेळी कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी ईश्वरीय ज्ञानाचा अंगिकार केल्यास आपण नम्रप्रिय व शिस्तप्रिय बनुन जिवनात आमुलाग्र परिवर्तन घडवू शकता व सकारात्मक विचाराने तणावमुक्त व चिंतामुक्त जीवन जगा असा मोलाचा संदेश दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुरुंग अधिकारी बकसर मुलानी यांनी केले.यावेळी प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या वतीने बीके धनजंय चक्रवार व रामेश्वर भाई यांची उपस्थिती होती.यावेळी कारागृहातील बहुतांश कर्मचारी व संपूर्ण महिला बंदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कारागृहातील टिमचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता शेवटी राजयोगा मेडिटेशनने करण्यात आली.