नांदेड: राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून मनशांती शक्य – बीके भगवान भाई

0
149

नांदेड,महाराष्ट्र: राजयोग मेडिटेशन द्वारा आपल्या कर्मइंद्रियवर नियंत्रण ठेऊन कार्यात कुशलता, सकारात्मक चिंतन, वृत्ती, दृष्टी, आणि दृष्टीकोन प्राप्त करता येते. यामुळे आपला व्यर्थ पासून बचाव होतो. राजयोगाच्या अभ्यासाने तणावमुक्त बनून आपण अनेक मानसिक आणि शारीरिक बिमारीपासून स्वतःला वाचवू शकतो व यापासून वाचण्याचा राजयोग हे एकमेव कवचकुंडल आहे असे उद्गार ब्रह्माकुमारी संस्था मुख्यालय माउंट आबू राजस्थान येथून
आलेले ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी ब्रह्माकुमारीज राजयोग सेवाकेंद्र कैलासनगर नांदेड येथे दोन दिवसीय राजयोग साधना कार्यक्रमात उपस्थित ईश्वर प्रेमी बीके बंधू भगिनी समोर राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून मनशांती शक्य या विषयावर बोलताना काढले. ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी राजयोग मेडिटेशनची माहिती देताना म्हणाले कि, स्वतःला आत्म निश्चय करून सूर्य, चंद्र, तारांगणच्याही पलीकडे राहणारे सर्व आत्म्याचे परमपिता परमात्माची आठवण करणे, आत्म्याची शक्ती असलेले मन, बुद्धीने पाहणे, त्यांच्या सर्व गुणाचे गुणगान करणे व त्यांच्याकडून दिव्यगुण व शक्ती धारण करणे म्हणजेच राजयोग होय. राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून आपण परमात्मा मिलनाचा अनुभव करू शकतो व याच अभ्यासाच्या माध्यमातून आपल्यात असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, द्वेष, ईर्षा या विकारावर विजय प्राप्त करून जीवनात सुख, शांती, आनंद मिळवू शकतो. राजयोगाने मनाला योग्य दिशा प्राप्त होऊन मनाचे व्यर्थ भटकणे समाप्त होते.

ब्रह्माकुमारीज राजयोग सेवाकेंद्र कैलासनगर नांदेडच्या संचालिका राजयोगिनी शिवकन्या बहेनजी यांनी राजयोगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अंग बनवून तणावमुक्त जीवन
जगा असा संदेश उपस्थित सर्वाना दिला. राजयोगिनी शिवकन्या बहेनजीने राजयोगी भगवान भाईंचे नांदेडला आल्याबद्दल स्वागत व सन्मान केला व यापुढेही जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्रात याल तेंव्हा तेंव्हा नांदेडला अवश्य यावे असे निमंत्रण हि दिले. तसेच बीके बालाजी भाई यांनी पण राजयोगी भगवान भाई यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार
केला. या कार्यक्रमाला बीके माधव भाई, बीके एकनाथ भाई, बीके नागनाथ भाई यांची
प्रामुख्याने उपस्तीथी होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना बहन यांनी केले व आभार प्रदर्शन बीके बालाजी भाई
यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राजयोगी भगवान भाई यांनी राजयोगा मेडिटेशनचा अभ्यासाने उपस्थित सर्वाना शांतीचा अनुभव करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलासनगर सेवाकेंद्राच्या बीके बंधू-भगिनीनी अथक परिश्रम घेतले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें