नांदेड: जीवनात आलेल्या संकटाना सांगा की माझा ईश्वर तुझ्यापेक्षा मोठा आहे – बीके डॉ. सुधा कांकरिया

0
223

नांदेड, महाराष्ट्र: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्हा कारागृहात बंदी बांधवासाठी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंडर गिनिज बुक मध्ये नोंद असलेल्या व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बीके डॉ. सुधा कांकरिया या होत्या. याप्रसंगी डॉ. सुधा कांकरिया यांनी सांगितले की, मनशांती आपल्या जवळ आहे परंतु आपण ती इतर ठिकाणी शोधत असतो. शांती हा आत्माचा स्वधर्म आहे. तसेच जीवनात संकटे, अडचणी आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात म्हणून संकटाला ना घाबरता तोंड द्या व त्यावर हसतखेळत मात करा. जीवनातील संकटे मोठे नसतात संकटाला सांगा की माझा ईश्वर साथी तुझ्यापेक्षा मोठा आहे. आपण जसे विचार करतो तसेच घडत असतो. म्हणून सदैव चांगले विचार करा म्हणजे चांगलेच घडेल असे कारागृहातील बंदी बांधवाना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र नांदेडच्या वतीने बीके जयमाला बहेनजी, बीके लाजवंतीमाता प्रेमचंदांनी, बीके नागनाथभाई महादापुरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून प्रामुख्याने उपस्तीथी होती. याप्रसंगी कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी बीके डॉ. सुधा कांकरिया सहित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व कारागृहात येऊन सेवा दिल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र नांदेडचे प्रमुख संचालिका राजयोगिनी बीके शिवकन्या बहेनजी व सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र नांदेडच्या वतीने बंदी बांधवांचे थंडीपासून स्वरक्षण व्हावे यासाठी चादरी (ब्लॅंकेट) भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्देश व सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय बीके नागनाथभाई महादापुरे यांनी करून दिला व कारागृहातील सेवेची संधी दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सर्वजण तणावापासून दूर राहावे व मनोबल वाढावे या उद्देशाने राजयोग मेडिटेशनने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी कारागृहातील टीमने मोलाची भूमिका बजावली.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें