नाशिकः द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन, आदिमातेच्या प्रदर्शनाचे ( मेळ्याचे ) उदघाटन

0
155

नाशिक,महाराष्ट्र: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, द्वारका सेवा केंद्रातर्फे टाकळी रोड वरील शंकर नगर चौफुली येथे नवरात्री निमित्त द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन, आदिमातेच्या प्रदर्शनाचे उदघाटन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या  मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, माजी महापौर दशरथ पाटील, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत श्री भक्तीचरणदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २४ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनास नाशिककरानी भेट द्यावी , असे आवाहन ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांनी केले. 

विश्वविद्यालय वर्षभर विविध अध्यात्मिक अन् सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

कार्यक्रमास माजी महापौर दशरथ पाटील,पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत श्री भक्तीचरणदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल,श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त श्रद्धा दुसाने-कोतवाल,युवा नेते प्रेम दशरथ पाटील,नाशिक रोड सेवा केंद्राच्या संचालिका पारू दीदी, माजी नगरसेविका अर्चना थोरात, इन्स्पायर मानक संस्थेचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉ.विनीत चोरडिया आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

माजी महापौर  दशरथ पाटील म्हणाले की, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय घरा घरात संस्कार अन् संस्कृती पोहोचविण्याचे काम करत असते. सुंदर आणि प्रेरणादायी असा आकर्षक देखावा सादर केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. आपल्या सर्वांचे आयुष्य या संताना मिळावे अशी प्रार्थना देखील यावेळी पाटील यांनी केली. 

यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदिदी यांनी म्हणाल्या की, या अध्यात्मिक प्रदर्शनाद्वारे ईश्‍वरीय परिचयासोबतच आध्यात्मिक आणि आध्यात्मिक प्रगती, आपले गुरू, आपली शक्ती, या सर्वांचा परिचय इथे मिळेल.नवरात्रमध्ये नऊ दिवसांमध्ये शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याला नऊ दुर्गा किंवा नवरात्र असे म्हणतात.दुर्गा माता ही आपल्या सर्वांसाठी सर्वोत्तम प्रतीक असून निर्भयता व श्रेष्ठतेचे प्रतिक आहे.भगवान शिवाची देशभरात बारा ज्योतिर्लिंगे असून या सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन याच ठिकाणी सर्वांना मिळणार असून त्यामुळे सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊन दुःख दूर होतील सर्वांना धन्यवाद समृद्धी किती प्राप्त होईल आणि ब्रह्मकुमारीद्वारे अध्यात्मिक व आत्मज्ञानाची अनुभूती मिळेल.असे सांगत ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला.

महंत भक्तीचारानदास महाराज यांनी या उपक्रमाचे कौतुक करत प्रजापिता ब्रह्माकुमारी शांतिद्वारे अध्यात्मिक शिक्षण आणि आनंद तसेच शांतीचा महामंत्र मिळत असतो.तसेच राजयोगाद्वारे सर्वांचे जीवनामध्ये मनःशांती एकाग्रता तणाव मुक्ती इत्यादी अनेक सकारात्मक गोष्टी होत असतात असे त्यांनी सांगितले.सतीश शुक्ल यांनी सांगितले की मनुष्याला जगण्यासाठी आत्मिक शांती आवश्यक असते त्यासाठी मन शक्तिशाली होण्यासाठी ब्रह्माकुमारीद्वारे दिल्या जाणाऱ्या राजयोग आणि अध्यात्मिक कार्याचे कौतुक केले.  यावेळी  महानगरपालिकेचे अधिकारी विजय काठे आणि  महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी संघटनेचे  नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणेसर यांचा सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला माजी नगरसेविका अर्चना थोरात यांनी कार्यक्रमाचे स्वागत  व प्रास्ताविक केले.यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर तर  द्वारका सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिली यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे साधक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें