नाशिक,महाराष्ट्र: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथील “प्रभू प्रासाद,” म्हसरूळ या सेवा केंद्राचा वर्धापन दिन संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यंच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे,कर्मयोगी संन्यासी स्वामी श्रीकंठानंदजी महाराज,मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, माजी महापौर रंजना भानसी, त्रंबकेश्व र नगरसेवक कैलास चौथे,साप्त.आपला आवाजचे संपादक अमोल सोनवणे, इंदिरानगर सेवा केंद्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी विना दीदी, नाशिकरोड सेवा केंद्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी पारू दीदी, गंगापूर रोड सेवा केंद्राच्या राजयोगिनी मनीषा दीदी,राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी, महाराष्ट्र राज्य अपंग कर्म./अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी, स्वागत त्रंबकेश्वर सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी मंगल दीदी व आभार प्रदर्शन द्वारका सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारी साधक परिवार व सेवेकरी उपस्थित होते.