नाशिक : ब्रह्मा कुमारी म्हसरुळ केंद्रात बालसंस्कार शिबिर

0
187

ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या बालसंस्कार शिबिराचे दीपप्रज्वलन करुन उदघाटन करताना जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी. समवेत ब्रह्मकुमारी पूनम दीदी, डॉ. राजेश भाई, कवी रवींद्र मालूंजकर, समीना बहेन, मनीषा राऊत, योगाचार्य रूची बहन.

शिबिराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास शक्य वासंती दीदी:

नाशिक,महाराष्ट्र : प्रतिनिधीबाल वयात मुलांवर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. उन्हाळी सुट्टीचा उपयोग विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी करावा, शिबिरात सहभागी झालेले सगळे महान आत्मे आहेत. आपल्याला काही तरी बनायचे आहे. असा विचार प्रत्येक बालक करतो.  जीवनात मोठे होण्यासाठी परमपिता, परमात्मा यांचे ऐका, देवाला सर्वजण मानतात.आई वडिल हा पहिला गुरु असतो, शिक्षक हे संस्कार करतात. शिबिरात शिकलेल्या गोष्टी भविष्यासाठी उपयोगी पडतील, असे विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या नाशिक जिल्हा केंद्राच्या मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी  यांनी व्यक्त केले.म्हसरुळ येथील केंद्रावर  बालसंस्कार शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ब्रह्माकुमारी पूनमदीदी, डॉ. राजेश भाई, कवी रवींद्र मालूंजकर उपस्थित होते.वासंती दीदी म्हणाल्या की, बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याबरोबरच त्यांना विविध प्रकारचे अध्यात्म व भावी जीवनात उपयुक्त गोष्टींचे ज्ञानार्जन करण्याचे काम केले जाणार आहे. या शिबिरात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी मनोगतात शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ब्रह्मकुमारीद्वारे दिले जाणारे मूल्य व अध्यात्मिक शिक्षणाद्वारे सकारात्मक विचार. एकाग्रता, स्मरणशक्ती या गुणांचा विकास होत विद्याथ्यामध्ये  सत्य-असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित होणार आहे. या शिबिरातून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व सांघिक हालचाली,खेळ,मानसिक व शारिरिक आरोग्य, आहार, योगासने, अभ्यास कसा करावा, याबाबतची माहिती या शिबिरात दिली जाणार आहे. कवि रवींद्र मालूंजकर यांनी  नाशिक जिल्ह्यातील तालुके व त्यांची वैशिष्टे कवितेद्वारे मनोरंजन करत विद्यार्थ्यांना जिल्ह्याची सफर घडविली. विविध कवितांचे सादरीकरण करत संस्काराचे महत्व सांगितले.डॉ. राजेश भाई यांनी शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. शरीराबरोबरच मनाचे आरोग्यही महत्वाचे आहे. त्यासाठी चांगले विचार  आत्मसात केले पाहिजे, शरीराला पुरेशी झोप महत्वाची आहे. मेडिटेशनद्वारे मनशांती मिळते. यावेळी मेडिटेशनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.  यावेळी योगाचार्या बीके रूची बहेन यांनी योगासनाचे विविध प्रकार घेतले. सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी केले. प्रास्तविक बाळासाहेब सोनवणे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बीके मनीषा राऊत यांनी केले. आभार बीके समीना बहन  यांनी मानले. यावेळी बीके. मोहन राऊत, ऍड. चिंतामण हाडपे, ब्रह्मकुमार विपुलभाई,ब्रह्मकुमार  निखिल भाई, गिरीशभाई आदींसह साधक उपस्थित होते. या शिबिरात 125 मुले सहभागी झाले आहेत. 22 मे पर्यंत शिबिर होणार आहे.


कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें