नाशिक: ब्रह्मकुमारी तर्फे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे द्वादश ज्योतिर्लिंग व अध्यात्मिक मेळ्याचे उद्घाटन 

0
401

दोन्ही कानांना वाईट ऐकण्यापासून परावृत्त करावे.:- ब्रह्माकुमारी संतोष दीदी 

नाशिक,महाराष्ट्र: जे काही वाईट दुर्गुण असतील  ते माझ्याकडे अर्पण करा , असे म्हणणारा एक निराकार शिव परमात्माशिवाय जगात कोणीही नाही. व्यक्तीमधील दुर्गुण वाईट संस्कार मनुष्याला खूप त्रास देत असतात. या दुर्गुणांना दूर करण्यासाठी आपण आपले दुकान अर्थात दो कान म्हणजेच दोन्ही कानांना वाईट ऐकण्यापासून परावृत्त करावे. त्यामुळे आपण पर चिंतन परनिंदा करणार नाही व यातून आपली आत्म उन्नती साधली जाईल.   आपण प्रत्येक वेळेस शुभ विचार करू शुभचिंतन करू आणि जसे आपण विचार करणार तसे आपले प्रारब्ध सुद्धा बनेल तसे आपले भविष्य सुद्धा साकारले जाईल. यामुळे आपल्या मनावर नियंत्रण करणे खूप गरजेचे असून यासाठी आमच्या ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे विविध केंद्रांवर राजयोग हा मेडिटेशन कोर्स घेतला जातो असे प्रतिपादन  ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदी  यांनी केले. 

     प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे त्रंबकेश्वर येथील मेन रोड येथे भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन दिनांक २ ते १४ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे  या आध्यात्मिक मेळ्याचे उद्घाटकीय संबोधन देताना त्या बोलत होत्या.व्यासपीठावर आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती, निरंजनी आखाड्याचे महंत धनंजय गिरीजी,  जुना आखाड्याचे महंत विष्णू गिरी जी महाराज,  अग्नी आखाड्याचे महंत दुर्गानंद जी महाराज, ब्रह्मचारी अटल आखाड्याचे महंत उदयगिरीजी महाराज,  निर्मल आखाड्याचे महंत गुरप्रीत सिंहजीमहाराज,  महानिर्वाणी आखाड्याचे महंत अजय पुरी महाराज,  बडा उदासीन आखाडा चे महंत गोपालदास जी महाराज,  गोरक्षनाथ मठाचे महंत यशनाथ जी महाराज,  जुने महादेव मंदिर चे महंत देवराज पुरी महाराज,  सिताराम आखाड्याचे महंत सिताराम बाबा तसेच पुरोहित संघ त्रंबकेश्वर चे अध्यक्ष मनोज थेटे,  पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत भाऊ गायधनी,  त्र्यंबकेश्वर मंदिरा विश्वस्त  सत्यप्रिय शुक्ल,  सुयोग वाडेकर,  संतोष कदम  असे विविध मान्यवर, आखाड्यांचे धर्मगुरू संत महंत उपस्थित होते.  ब्रह्माकुमारी संतोष दीदी यांनी पुढे सांगितले की परमात्म्याचे साकार शरीर नसल्याने त्यांचे सर्व नावे ही गुणवाचक आहेत आणि या नावांमधूनच भगवंताची महती आपल्याला कळत असते.  

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.  स्वागत ब्रह्माकुमारी विना दीदी. ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी ईश्वर स्मृतीचा टिळा लावून व पुष्पगुच्छद्वारे स्वागत केले.

  नाशिक जिल्हा प्रमुख ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून  राजयोगचे महत्व व  संस्थेचा परिचय करून दिला. 

       यावेळी प्रमुख अतिथी आनंद आखाडा प्रमुख स्वामी शंकरानंद  सरस्वती महाराज यांनी  सांगितले की, आपल्या भारत देशात विविध मत पंथ, संप्रदाय आहेत मात्र सर्वांचा मुख्य उद्देश एकच आहे तो म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होणे आणि हाच उद्देश पूर्ती येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे लावण्यात येणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंग प्रदर्शन मधून साकार होतांना आपल्याला दिसतो. 

महंत विष्णु गिरी महाराज,जुना आखाडा यांनी सांगितले की 

ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय द्वारा आयोजित १२ ज्योतिर्लिंग प्रतिमा चे स्वरूप दर्शन त्रंबकेश्वरमध्ये येणार्‍या सर्व देश विदेशच्या भाविकांसाठी भागवत प्राप्तीचा मार्ग  दाखवेल. 

    पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रशांत गायधनी यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर नगरीमध्ये आजचा दिवस स्वर्ण अक्षरात लिहिला  जाईल. नुकतेच माझ्या सौभाग्याने मला रक्षाबंधनानिमित्त ब्रह्माकुमारी भगिनींमार्फत राखी बांधण्यात आली. सोबतच अतिशय कमी शब्दात ब्रह्माकुमारी भगिनींनी मला रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करून दिले.  १५ वर्षापासून मी कुठलेही रक्षाबंधन साजरा करत नव्हतो मात्र पंधरा वर्षात प्रथमच दीदींनी मला जे आध्यात्मिक रहस्य सांगितले त्यातून मी ब्रह्माकुमारी भगिनींच्या शुभकरकमलाद्वारे राखी बांधून माझे सौभाग्य प्राप्त केले. ब्रह्माकुमारी संस्थेचा विश्वमधील विस्तार हा अफाट आहे यातून लाखो लोक नियमित राजयोग मेडिटेशन करत असतात ४०००० या संस्थेच्या बालब्रह्मचारी भगिनी आहेत ज्या पूर्ण देशातील विविध सेंटर चे संचालन उत्तमरीत्या करीत आहेत. दिलीप भाई काठे,सामाजिक कार्यकर्ते विजयानंद स्वामी, भाजपा तालुका अध्यक्ष व  माजी नगरसेवक विष्णू भाऊ दोबाडे, सामाजिक कार्यकर्ते सागर गमे, अनिल भाऊ जोशी.सुयोग वाडेकर, बंडू आहेर, इत्यादी मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले त्र्यंबकेश्वर येथील महंत कोतवाल यांनी सर्व मठाधिपती व  आखाडे प्रमुख यांना आमंत्रित करण्यासाठी विशेष सहकार्य केले

कार्यक्रमात संजय अकॅडमीच्या नृत्यकला पथकाने सुन्दर नृत्य सादर केले. ब्रह्माकुमार ओंकार यांनी आध्यात्मिक भावगीत गाऊन उपस्थितांना भगवंताशी एकरूप केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कोपरगाव, येवलासह नाशिक जिल्ह्यातून विविध सेवा केंद्राचे समर्पित भगिनींनी  व साधक उपस्थित होते. हा बारा ज्योतिर्लिंग दर्शन आध्यात्मिक मेळा १४ तारखेपर्यंत भाविकांसाठी खुला राहणार असून अधिकाधिक भाविकांनी या मेळाव्यामधील द्वादश ज्योतिर्लिंग व आध्यात्मिक प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्र्यंबकेश्वर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी मंगल दीदी यांनी केले आहे. आभार  द्वारका सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी मानले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें