ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना अपंग संघटनेचे विभागीय अध्यक्ष बीके. बाळासाहेब सोनवणे, समवेत जिल्हा मुख्य संचालिका वासंती दीदी, भागवत उदावंत, फ्लॉवर गार्डनचे संचालक गोकुळ पाटील, नितीन गायखे, रामदास नागवंशी आदी.
नाशिक,महाराष्ट्र: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी त्र्यंबकेश्वर सेवा केंद्राच्या मुख्य ब्रह्माकुमारी मंगल दीदी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, नाशिक गार्डन फ्लॉवर्सचे गोकुळ पाटील, नितीन गायखे, पत्रकार रामदास नागवंशी, बी.के. नितीन, बी.के. निखिल निकम आदी उपस्थित होते. विश्वशांती, मनशांती तसेच मानवता सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणार्या जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांच्या छत्रछायेखाली व मार्गदर्शनानुसार ब्रह्माकुमारी पूनम दीदी या तीस वर्षांपासून कोर्स तसेच विविध कार्यक्रमांमधून ध्यान धारणा व राजयोगाचे फायदे विशद करीत असतात. जीवनात प्रेम, शांती, सुख, समाधान, पवित्र्यता, शक्ती, ज्ञान हे सदगुण प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असल्यास जीवन आनंददायी होते, हे विविध प्रकारचे दाखले देत शिवबाबा यांच्या कार्याची महती सांगत असतात. वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेब सोनवणे यांनी सत्कार केला. यावेळी साधक व ब्रह्माकुमारी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.